कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

सहज सुचलेले...

स्वप्न प्रत्येकानेच पहावीत
तो अधिकार प्रत्येकालाच आहे
पणप्रत्येक स्वप्न पूर्ण झालच पाहिजे
असा अट्टाहास नको
कारण स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत
पण काही स्वप्न पूर्ण करायची म्हणजे
काहीतरी मोजाव लागत
स्वप्न पाहणार्यालाही  आणि
ती पूर्ण करणाऱ्यालाही

 एखाद्या गोष्टीला चांगल्या दृष्टीने पाहिलं
म्हणजे उंची वाढते
त्या गोष्टीचीही आणि आपलीही.

प्रकाशात उजळलेल्या घराकडे पाहिलं जात
प्रकाशाच्या कारणाकडे नाही
कारण प्रकाशाच्या कारणाकडे पहिल्याने
डोळे  दिपतात. मानवी डोळ्यांची ते सहन करण्याची क्षमता नाही.



No comments:

Post a Comment